Description
मूतखडा, मूत्रदाह तसेच V-PROTEC मूत्रवहनसंस्थेच्या इतर विकारांत उपयुक्त
वृक्क, मूत्रनलिका, मूत्राशय आणि मूत्रमार्ग या अवयवांना एकत्रपणे मूत्रवहनसंस्था असे म्हटले जाते. शरीरातील चयापचयात उत्पन्न झालेल्या मलसदृश्य घटकांना उत्सर्जित करण्याचे तसेच आवश्यक ते घटक राखून ठेवून ते पुन्हा रस-रक्त संचरणात सोडण्याचे अवघड कार्य या अवयवांद्वारे होते. जीवनभर हे कार्य करत असल्याने आणि विषारी घटकांना उत्सर्जित केल्याने या अवयवांच्या कार्यात विकार उत्पन्न होणे हे स्वाभाविक आहे, म्हणूनच मूत्रवहनसंस्थेची विशेष निगा राखणे आवश्यक आहे. लघवी करताना आग होणे, थांबून थांबून लघवी होणे, लघवी अनेक धारा असलेली होणे, लाल रंगाची लघवी होणे, रक्तमिश्रित किंवा गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे
किंवा अजिबात लघवी न होणे अशी मूत्रमार्गाच्या अथवा शरीराच्या व्याधींची लक्षणे होत.
मूत्रमार्गाच्या व्याधींत मूत्राश्मरी आणि मूत्रमार्गाची आग होणे हे विकार जास्त करून आढळतात. मूत्रातील द्रव्यप्रमाण कमी होणे तसेच घनता वाढणे ही मुख्यतः मूतखडा होण्याची कारणे होत. मूतखडा आणि लघवी ची जळजळ यासाठी ‘व्हि-प्रोटेक्ट’ हे एक उत्तम औषध आहे. यात असलेल्या अपामार्ग, पाषाणभेद, वरुण छाल, साग वीज ह्या वनस्पती मूत्राश्मरी नाहीशी करण्यात सहाय्यभूत होतात. हजरत यहूद, पलाशपुष्प, पुनर्नवा तसेच गोक्षुर हे मूत्राचे प्रमाण वाढवून, मूत्राचे आम्लत्व कमी करून मूत्रदाह कमी करतात. योगिनी प्रॉडक्टस् ने निर्मिलेली ‘व्हि-प्रोटेक्स’ ही आयुर्वेदिक तज्ञांनी विचारपूर्वक तयार केलेली औषधी आहे.
Reviews
There are no reviews yet.